अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 4 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.30
● सातारा, कराडला शंभरावर रूग्ण
● 24 तासात रूग्ण वाढले
● 3 हजार 805 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेट 13.01 वर
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ सलग चौथ्या दिवशी पाचशेच्या खाली असून आठ तालुक्यात रूग्णवाढीचा आलेख घसरला आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्याने 495 रूग्ण वाढले असून 3 हजार 805 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. या आकडेवारीवरून गेल्या 24 तासातील पॉझिटिव्हीटी रेट 13.01 वर पोरचला आहे.
माण, महाबळेश्वरसह तालुके सावरले
जिल्ह्यात माण, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावली तालुक्यात कोरोना रूग्णवाढ आटोक्यात आली आहे. जावली तालुक्यात 14 रूग्ण वाढले असून महाबळेश्वर तालुक्यात 6 रूग्णांची वाढ झाली आहे. पाटण तालुक्यात 18 रूग्ण वाढले आहेत. माण तालुुक्यात 18 तर कोरेगांव तालुक्यात 36 रूग्णांची वाढ झाली आहे. खंडीळा तालुक्यात 50 रूग्ण वाढले आहेत. सातारा तालुक्यात 103 तर कराड तालुक्यात 101 रूग्णांची वाढ झाली आहे. कराड व सातारा तालुक्यात रूग्णवाढीने पुन्हा शंभरी पार केली आहे.
चाचण्यांची संख्या घटली
कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमालीचा घसरला असून जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रूग्णवाढ पाचशेच्या खाली आहे. रूग्णवाढीचा आकडा जसा घसरला आहे तशीच संशयितांच्या चाचण्यांची संख्याही कमालीची घटली आहे. अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रांवर शुकशुकाट असून लसीकरण केंद्रांवरील गर्दी कायम आहे. चाचण्यांची संख्या सलगपणे घटल्याने दिलासादायक चित्र आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात
एकूण नमुने 3805
एकूण बाधित 495
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 25,06,603
एकूण बाधित 2,76,881
एकूण मृत्यू 6574
मुक्त 259806