ऑनलाईन टीम/तरुण भारत
सहा दिवसात तेल कंपन्यांनी या पाचव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रविवारी पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागले आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 99.11 रुपये/लीटर आणि डिझेल 90.42 रुपये/लीटर मिळत आहे. यापूर्वी 22, 23, 25 आणि 26 मार्च रोजी 80 ते 80 पैशांची वाढ झाली होती. मार्च महिन्यात गेल्या सहा दिवसांपासून महागाई वाढत आहे. 22 मार्चपासून आतापर्यंत एलपीजी आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नव्हते. त्यानंतर मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर गेल्या मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागलीय. दोन दिवस भाव वाढवल्यानंतर, तेल कंपन्यांनी तिसर्या दिवशी दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता आठवड्यात पाचव्यांदा तेलाच्या दरात पुन्हा ५० पैशांनी आणि ५५ पैशांनी वाढ झालीय.