आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी( आ ) येथील सायली अक्षय चव्हाण या विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी उजेडात आली. या खुनाचा आटपाडी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दीड तासात पती अक्षयसह चार आरोपींना जेरबंद केले. यात मूळच्या उत्तरप्रदेश येथील तीन आरोपींचा समावेश आहे.
पुजारवाडी येथील सायली चव्हाण हिचा गळा चिरून बाथरूममध्ये खून करण्यात आला. प्रारंभी हा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याचे पती अक्षय याने भासविले. सपोनि रोहिदास गभाले, सुधीर पाटील, उपनिरीक्षक अजित पाटील, पोलिस हवालदार जगन्नाथ पुकळे, गणपत गावडे, नंदकुमार पवार, रामचंद्र खाडे, दिग्विजय कराळे, दादासो खोत, विकास जाधव, मेहबूब मुजावर, सौरभ वसमाळे, बजरंग सरगर यांनी तपासाला गती दिली आणि पती अक्षय चव्हाण याला पोलिसी खाक्या दाखवून बोलते केले.
अक्षय चव्हाण याला दारूचे व्यसन आहे, त्यातून तो घरी उशिरा जाई. यामुळे पती पत्नीमध्ये सारखा वाद होई. अक्षय हा पत्नी सायली हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातून शुक्रवारी मध्यरात्री अक्षयने आपले सहकारी मित्र रणजित उर्फ शिवा लालसिंग, अंकित कुमार सिंह व आणखी 1 अल्पवयीन यांना सोबत घेऊन सायलीचे तोंड बांधले आणि बाथरूममध्ये नेले. तेथे अक्षयच्या परप्रांतीय 3 मित्रांनी सायलीचा निर्दयपणे गळा कापला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








