प्रतिनिधी / आटपाडी
सांगली जिल्हा बँक व राजकीय संघर्ष यातून रविवारी सांयकाळी आटपाडी पोलीस स्टेशन जवळच भाजप व राप्ट्रवादी कार्यकर्यात राडा झाला. तूफान दगडफेक झाली. भाजप विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद यांच्या गाड्याना लक्ष करण्यात आले. प्रतिहल्लात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघे गाडीने धडक बसल्यांने जखमी झोल्याची माहिती मिळाली आहे.तर पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या राड्यात सांयकाळी पोलीस ठाण्याजवळच धुमाकूळ घातला. यावेळी आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक ही करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे दोघे कार्यकर्ते जखमी झाले असुन जखमीवर दांणगावा सांगलीच्या वसंतदादा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर यावेळी दोन्ही बाजूकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच सद्या परिस्थिती नियंत्रणात असुन पोलीस बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे.








