प्रतिनिधी /पणजी
केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात ‘आयटक’ या कामगार संघटनेतर्फे राजधानी पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली. त्या योजनेच्या विरोधातील देशव्यापी आंदोलनासही पाठिंबा दर्शवण्यात आला.
सदर योजनेत नोकरीची शाश्वती नाही. चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्या युवकांचे काय होणार ? याची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी मागणी निदर्शकांनी केली. आर्थिक सुरक्षाही त्यांना नसल्याची टीका नोंदवण्यात आली. आयटकचे सरचिटणीस राजू मंगेशकर व सुमारे 50 जणांनी आंदोलनात भाग घेऊन केंद्राच्या या योजनेचा निषेध केला.









