अलाहाबाद
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मागील दोन वर्षांपासून आझम हे तुरुंगात आहेत. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर अवैध कब्जा केल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांना हा जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी जामीन मिळाला असला तरीही आझम यांना तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आकाश सक्सेना यांनी त्यांच्याविरोधात आणखीन एक तक्रार नोंदविली आहे. आझम यांनी रामपूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे बनावट प्रमाणपत्र तयार करवून घेत मान्यता मिळविली होती असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयात अद्याप सुनावणी झाली नसल्याने आझम यांना तूर्तास तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही.









