प्रतिनिधी / रत्नागिरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आज 19 फेब्रुवारी 2021 रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रत्नागिरीतील शिवाजी नगर विभागाचे ’छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे स्वयं नामकरण करणार असल्याचे मनसे उपशहरअध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांनी सांगितले आहे.
आता पर्यंत आम्ही शिवाजी नगर विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज नगर व्हावे यासाठी नगर परिषद रत्नागिरी यांना निवेदन दिले होते. परंतु हा विषय फक्त बॉडीवर घेतला गेला असून नामकरण झालेले नाही. त्यामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख टाळून मनसे रत्नागिरी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेर्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी 10ः30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टॉपजवळ होणार आहे.









