प्रतिनिधी/ बेळगाव
होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्मयात रविवारी दुपारपासून दारूविक्री बंदीचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
रविवार दि. 28 मार्चच्या दुपारी 2 पासून सोमवार दि. 29 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बेळगाव, शहर, उपनगरे व तालुक्मयातील बार, दारू दुकाने, बार ऍन्ड रेस्टॉरन्ट बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. रविवारी होणारी होळी व दुसऱया दिवशी होणाऱया रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.