प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीचे काम हाती घेण्यात आल्याने सदाशिवनगर येथून ग्रामीण भागात करण्यात येणाऱया गावांचा वीजपुरवठा बुधवार दि. 16 रोजी ठप्प करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी, मण्णूर, सोमनाथ नगर, सरस्वतीनगर, विजयनगर, गोजगा या भागात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.









