वार्ताहर/ थिवी
थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांना समाजात मुळ घट्ट आहे आणि अन्य समाजानेही त्यांना मान्यता दिली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षात येऊन त्यांना अद्याप वर्षही झाले नाही मात्र यंदा हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. व ते सुवर्ण महोत्सवी वर्षातच ते शतक मारणार आहे. ते मंत्री होऊन गोवा राज्य वेगळय़ा दृष्टीने पुढे जाणार आहे. सर्वांना वाटते किरणाच्या आयुष्यात किरण व्हावा. तेही भंडारी समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी, गोव्यासाठी किरण व्हावा असे सांगून सर्वांना हृदयापासून वाटते. गोव्याला सुटका द्यावी यासाठी कुणीतरी प्रतिनिधीत्व घ्यावे लागते असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रेवोडा येथे केले.
किरण कांदोळकरांच्या 50 व्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात श्री. सरदेसाई बोलत होते. आज धाडसी नेते आम्हाला पाहिजे. सर्व गोवेकरांना बदल पाहिजे. तोंडात स्पष्ट बोलणारे लोकप्रतिनिधी पाहिजे आणि ती धमक किरण कांदोळकरमध्ये आहे अशी माहिती श्री. सरदेसाई यांनी दिली. यावेळी आमदार विनोद पालयेकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, कविता कांदोळकर, संतोष कुमार सावंत, ऍड. जितेंद्र गांवकर, दिपक कळंगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारला घरी बसविण्याची वेळ आली
किरण कांदोळकर म्हणाले की, सावंतवाडी सरकार घरी बसवायचा असेल तर आम्हाला एक शपथ घ्यावी लागेल. गोवा राज्य पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांनी स्थानिक पक्ष राज्यात पुढे न्यायला पाहिजे यासाठी गोवा पक्षाला साथ द्यावी लागेल.
याप्रंसगी भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, सर्व पदाधिकारी, सरपंच पंच कार्यकर्ते आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून श्री. कांदोळकरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कांदोळकरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.









