सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना. शांततेचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विविध कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी आज बुधवारी राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे. एटीएममधून पैसे काढणेही अशक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही परिस्थिती पाहता केंद्र सरकार व विविध राज्य सरकारांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून शांततेचे आवाहन केले आहे.
या संपात देशातील 25 कोटी कामगार समाविष्ट होतील, असा दावा डाव्या संघटनांनी केला. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आल्याचे या संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. केंद्राच्या आर्थिक धोरणालाही विरोध केला जाणार आहे.
इंटक, आयटक, एचएमएस, सिटू, आयुटक, टीयुसीसी, सेवा, एआयसीसीटीयु, एलपीएफ, युटीयुसी इत्यादी संघटना या बंदमध्ये भाग घेणार आहेत. बँक कर्मचारी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिल्याने 80 टक्के बँक व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे. बंदच्या दुसऱया दिवशी एटीएममध्ये पैशाची कमतरता भासेल, असे अनुमान आहे.
बंदची कारणे…
ड 10 कामगार संघटनांचे विविध मागण्यांसाठी बंदचे आवाहन.
ड केंद्र सरकारच्या प्रस्तावित कामगार कायद्याला विरोध करणे.
ड केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा विरोध आणि निषेध करणे.
ड सार्वजनिक कंपन्यांमधील निर्गुंतवणूक धोरणाला विरोध करणे.
ड खासगीकरण निती आणि आर्थिक सुधारणांच्या विरोधात बंद









