शुक्रवारी नवीन 216 रूग्ण वाढलेः जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यूः 302 रूग्ण कोरोनामुक्तः
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात शुक्रवारी 302 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आजअखेर जिल्ह्यातील 40 हजार 17 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शुक्रवारी नवीन 216 रूग्ण वाढले. आजअखेर जिल्ह्यात 43 हजार 839 रूग्ण झाले असून त्यामधील दोन हजार 245 रूग्ण उपचारात आहेत. तर शुक्रवारी उपचार सुरू असताना पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात
महापालिका क्षेत्रात कोरोना आता आटोक्यात आला असून कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात नवीन 18 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 10 तर मिरज शहरात आठ नवीन रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 860 रूग्ण झाले आहेत. यातील 91 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 198 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात मात्र अद्यापही रूग्णसंख्या आटोक्यात आली नाही. दहाही तालुक्यात सरासरी 20 ने रूग्ण वाढत आहेत. शुक्रवारी नवीन 198 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 25, जत तालुक्यात 35 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 19, कवठेमहांकाळ तालुक्यात सात, तर खानापूर तालुक्यात 14 नवीन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मिरज तालुक्यात सहा, पलूस तालुक्यात 14, शिराळा तालुक्यात 26 रूग्ण वाढले. तासगाव तालुक्यात 14 तर वाळवा तालुक्यात 38 नवीन रूग्ण वाढले आहेत.
पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात शुक्रवारी उपचार सुरू असताना पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जत, खानापूर, वाळवा तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. तर सांगली आणि मिरज शहरात प्रत्येकी एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात कोरोनाने एक हजार 607 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर हा 3.66 टक्के इतका झाला आहे. हा मृत्यू दर कमी आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा मृत्यू दर कमी होताना दिसून येत नाही.
नवीन रूग्ण 216
उपचारात 2245
बरे झालेले 40017
एकूण 43869
मृत्यू 1607








