मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हा सल्ला फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होता, असा बोचरा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आजोबांनी सांगितले…राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत.आजोबांच्या सल्ल्याला नातवाच मान नाही आणि जामखेडचे आमदार चीपळूनच्या दौऱ्यावर. की आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी आज कोल्हापूर भागातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगली , सातार व कोल्हापूर पूरस्थितीची पाहणी केली आहे.
राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.