अक्कलकोट : प्रतिनिधी
मुंढेवाडी, ता.अक्कलकोट येथील ५५ वर्षीय व्यक्तीने आजारास कंटाळुन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विश्वनाथ सायबण्णा कोळी (वय- ५५) रा. मुंढेवाडी असे मयताचे नांव आहे. १७ जानेवारी रात्री रोजी ९ वा. ते १८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाचे दरम्यान घराशेजारी असलेल्या पत्राशेड गध्ये गळफास घेऊन मयत झाला. खबर मुलगा यलप्पा विश्वनाथ कोळी यांनी दिला. अधिक तपास पो.ना. राठोड हे करीत आहेत.