गांधीनगर येथील घटना
प्रतिनिधी बेळगाव
आजाराला कंटाळून मारुती रोड, गांधीनगर येथील एका वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
निंगाप्पा बसलिंगप्पा नांगनूर (वय 60) मूळचा राहणार अरवळ्ळी, ता. बैलहोंगल सध्या राहणार मारुती रोड, गांधीनगर असे त्या वृद्धाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.
निंगाप्पा हे आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. अलीकडेच एका खासगी इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले होते. तरीही ताप कमी होत नाही याचा त्यांना मनस्ताप झाला होता. डॉक्टरांनी त्यांची कोरोना तपासणीही केली होती. अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांना ते समजावून सांगण्यात आले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.