माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
आजाराला कंटाळून रामतीर्थनगर येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
आनंद ईश्वर तोरगल (वय 43, रा. वमतीर्थनगर) असे त्याचे नाव आहे. त्याची वृध्द आई शांता तोरगल यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून आजाराला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आनंदला मुळव्याधीचा त्रास होता. यापूर्वी त्याला अर्धांगवायुचा झटकाही आला होता. त्याचे आरोग्य नाजुक बनले होते. त्यामुळे त्याचा त्याला मनस्ताप झाला होता. मंगळवारी रात्री 10 ते बुधवारी सकाळी 7.30 यावेळेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.









