- इम्युनिटी चांगली राहण्यासाठी सर्वांत गरजेचा आहे तो आहार. नियमित आहारात व्हिटॅमिन सीयुक्त फळे, लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा, टोमॅटो आदींचा समावेश केला गेला पाहिजे.
- प्रतिकारशक्तीसाठी झोप महत्त्वाची असून रोज पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे.
- याखेरीज आले घालून तयार केलेला चहा प्यायला पाहिजे. तसेच जेवणातही आल्याचे प्रमाण रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
- आतडय़ातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी दैनंदिन आहारात दही, ताकाचा समावेश केला पाहिजे. परंतु दही आणि ताकाचे प्रमाण रात्रीच्या जेवणात अधिक प्रमाणात असू नये.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायामामही महत्वाचा आहे. दररोज सकाळी व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य व्यायाम केल्यामुळे होते.
- काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. धावणे, पोहणे, व्यायाम करणे आणि वजन उचलणे यासारखे एरोबिक व्यायाम रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत.
- ताण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रतिकूल परिणाम करतो. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून दररोज 10 मिनिटे योगासने करा. याने ताणतणाव येणार नाही आणि प्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल.
- यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. दररोज अर्धा तास वेगाने चालल्याने वजन कमी होते. या व्यतिरिक्त आपले चयापचय आणि हृदय गती वाढते.
- शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे तहान लागल्यावर पाणी प्यायले पाहिजे. तसेच दिवसभरात किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवे.
– डॉ. संजय गायकवाड









