आजरा / प्रतिनिधी
आजरा तालुका किसान संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. 13 रोजी किसान आंदोलन विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शेती मालावरचा शेतकऱयांचा अधिकार नाकारणारे केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या लढानंतर मागे घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर आजऱयात सोमवारी किसान विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी तालुक्यातील शेतकऱयांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन किसान संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
किसान विजयी रॅलीच्या नियोजनासाठी सोमवार दि. 6 रोजी बैठक पार पडली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला कॉ. शांताराम पाटील, कॉ. दौलती राणे, कॉ. संपत देसाई, कॉ. काशिनाथ मोरे, कॉ. संजय घाटगे, शिवाजी गुरव, बी. के. कांबळे, प्रतिभा कांबळे, पद्मिनी पिळणकर उपस्थित होते.