कोगनोळी नाक्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेच्या आंदोलनाची घेतली दखल
वार्ताहर /कोगनोळी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील तपास नाक्मयावरून सीमाभागातील आणि महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱया आजरा, उत्तूर, गडहिंग्लज, चंदगडला जाण्यास कर्नाटक शासनाने परवानगी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनामुळे सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवार आणि गुरुवार सलग दोन दिवस अनुक्रमे कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि कोल्हापूर जिल्हा शिवसेना यांनी कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर उभारलेल्या तपास नाक्मयावर धडक दिल्याने कर्नाटक शासनाने कोगनोळी तपास नाक्मयावरून आजरा, गडहिंग्लज, उत्तूर, चंदगडला जाण्यास परवानगी दिली आहे.
आंदोलनातून उमटले पडसाद
कोगनोळी फाटय़ावर एक तपासणी नाका असतानाच दुसरा तपासणी नाका दूधगंगा नदीवर उभारून कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील लोकांची मोठी गैरसोय केली होती. याचे पडसाद आंदोलनातून उमटले आणि शेवटी आंदोलनाची कर्नाटक शासनाला दखल घ्यावी लागली. याबाबत कोगनोळी तपास नाक्मयावरील साहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्रातील नागरिकांचे आधारकार्ड पाहून त्यांना सोडले जात आहे, असे त्यांनी सांगितले.









