- पाहा कशात सूट आणि काय बंद
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. हे नियम राज्यात आजपासून लागू होणार आहेत. नवीन नियमावली अनुसार, आता शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू जारी असणार आहे. यासोबतच सोमवार ते शुक्रवार पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे.
नवीन नियमानुसार, आता रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनुसार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील सरकारी आणि खाजगी कार्यालये जेथे कर्मचाऱ्यांची संख्या 10 पेक्षा कमी असेल तेथे 100 टक्के आणि ज्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या 10 पेक्षा अधिक असेल तेथे 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केली जाणार आहेत.
या सोबतच सर्व बाजार, व्यावसायिक प्रतिष्ठान सोमवार ते शनिवार पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल सोमवार ते शनिवार सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. यासोबतच शहरात सकाळी 5 ते सायंकाळी 5 या काळात मिनी बस चालू असणार आहेत. मात्र, प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल. यासोबत मेट्रो देखील सुरू असणार आहे.
राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम या सर्वांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.