ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या 54 खाजगी कोरोना चाचणी सेंटरमुळे चाचण्यांच्या एकूण सेंटरची संख्या 300 पेखा अधिक होणार आहे.
याबाबत माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, यामध्ये पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या 244 ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- ‘वॉक इन’ पद्धतीने सुविधा उपलब्ध
तसेच http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरदेखील यादी उपलब्ध असेल. सुरुवातीस रोज सकाळी 10 ते 12 या कालावधीत ही चाचणी सुविधा केंद्रावर ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे.









