जुनी मिठाई विकता येणार नाही, मोटार वाहन नियमात सुसहय़ बदल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देश कोरोना संकटाच्या कालावधीमधून सावरत असताना 1 ऑक्टोबरपासून दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये काही नियम बदलणार आहेत. नियमांचा थोडक्मयात आढावा पाहूया
जुनी मिठाई विकण्यावर प्रतिबंध
आता यापुढे मिठाई दुकानदारांना जुनी मिठाई विकता येणार नाही. कारण सदरची मिठाई किती कालावधीपर्यंत विकावी यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे.
टीव्ही खरेदी महागणार
सरकारने टीव्ही निर्मितीत उपयोगात येणाऱया वस्तुच्या आयातीवर 5 टक्क्मयांचे सीमाशुल्क घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता टीव्हींच्या किमती वाढतील.
घरगुती गॅस होणार स्वस्त
सप्टेंबरमध्ये 14.2 किलोग्रॅम आणि 19 किलोगॅम सिलेंडरची किमत कमी झाली आहे. यामुळे सणास़ुदीच्या काळात गॅसच्या किमतीत घसरण होणार असल्याचे संकेत आहेत.
मोटार वाहन नियमात होणार बदल
परिवहन मंत्रालयाकडून मोटार वाहन नियमांमध्ये संशोधन करुन नवीन नियमावली सादर होणार आहे. आता वाहनांसंबंधीची आवश्यक कागदपत्रे सोबत संकलन करण्याऐवजी सर्व कागदपत्रेही वेब पोर्टलच्या माध्यमातून अपडेट करता येणार आहेत.
वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता
मोबाईलवर किंवा अन्य हॅण्ड हेल्ड डिव्हाईसचा वापर केल्यास चालणार आहे. परंतु याचा वापर फक्त रस्त्याची पडताळणी करण्यास करता येणार आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास 5 हजारपर्यंतची दंड आकारणी होण्याची माहिती आहे.
मोफत एलपीजी सिलेंडर मिळणार नाही
सरकारची लोकप्रिय योजना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून मिळणारा मोफत गॅस आता मिळणार नाही.
या व्यवहारांवर होणार कर आकारणी
केंद्र सरकारने विदेशात पैसे पाठविण्यावर आता कर वसूलीशी संबंधीत नवीन नियम सुरु केला आहे. विदेशात मुलांना किंवा नातेवाईकांना पैसे पाठवत असाल तर 5 टक्मयांचा कर भरावा लागणार आहे.
वाहन परवाना बनविणे झाले सोपे
रस्ते परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहन नियम 1981 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार यासंदर्भात नवीन नियमावली सादर केली आहे. नवीन नियमानुसार आता वाहन परवाना मिळवणे अगदी सोपे होणार असून अधिकच्या कागदपत्रांची आवश्यकता यापुढे भासणार नाही.
आरोग्य इन्शुरन्समधून आता अधिकची सुविधा
विमा नियामक आयआरडीएआयच्या नियमानुसार आरोग्य विमा इन्शुरन्स पॉलीसीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. कमीत कमी दरात अधिकच्या आजारांवर विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच कंपन्या आपल्या मनमानीने क्लेम रद्द करु शकणार नाहीत.
घर बसल्या मिळणार वित्तीय सुविधा
बँकांकडून ग्राहकांसाठी आता घर बसल्या चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आदींसारख्या बिगर वित्तीय सेवा मिळणार आहेत.









