ऑनलाईन टीम / मुंबई :
आज 21 जून. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आज 13 तास 13 मिनिटांचा दिवस तर 10 तास 47 मिनिटांची रात्र असते. आजपासूून सूर्याचे उत्तरायण संपतेे आणि दक्षिणायन सुरु होते.
आजपासून पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग बदलतो आणि त्यामुळेच हळूहळू दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. 21 जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी 13 तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो.
त्याचप्रमाणे वर्षातला सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर हा असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते.









