प्रतिनिधी/ रत्नागिरी :
लॉकडाऊन नियमांमध्ये शुक्रवारपासून शिथिलता देण्यात आली असून जिल्हांतर्गत बससेवा, रिक्षा आणि केशकर्तनालये आजपासून सुरू होणार आहेत. तब्बल दोन महिन्यांनी जिल्हय़ात पुन्हा एसटी धावणार असल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी जिल्हय़ातील 32 मार्गावर एसटीच्या 52 फेऱया सुरू होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक भोकरे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या नियमांमध्ये जिल्हय़ात शिथीलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी जारी केले. यामध्ये बसबरोबरच रिक्षा व केशकर्तनालये यांना विशिष्ट अटींवर अनुमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 19 मे 2020 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 मधील बदल करणारा हा आदेश शुक्रवार 22 मे 2020पासून लागू होईल असे आदेशात म्हटले आहे.
ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता एसटी फेऱया सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करून एसटी बसेस जिल्हय़ात धावणार आहे. एका बसमध्ये एका आसनावर एकच प्रवासी असे एकूण 22 प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. 32 मार्गावर 52 फेऱया सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मार्गावर धावणार बस
यामध्ये दापोली आगारातून दापोली- रत्नागिरी, दापोलीöखेड, दापोलीöचिपळूण, दापोलीöमंडणगड, खेड आगरातून खेडöरत्नागिरी, खेडöचिपळूण, खेडöदापोली, खेडöमंडणगड, चिपळूण आगरातून चिपळूणöरत्नागिरी, चिपळूणöखेड, चिपळूणö दापोली, चिपळूणöमंडणगड, गुहागर आगरातून गुहागर-आबलोली-रत्नागिरी, गुहागö चिपळूण-रत्नागिरी, गुहागरöचिपळूण, देवरुख आगरातून देवरुखöरत्नागिरी, देवरुखö साखरपाö लांजा, देवरूख ö चिपळूण आणि रत्नागिरी त्आगारातूनन रत्नागिरीöदापोली, रत्नागिरीöचिपळूण, रत्नागिरीöपालीöराजापूर, रत्नागिरीö नाटे, रत्नागिरीö जयगड, लांजा आगरामधून लांजाö पालीöरत्नागिरी, लांजाö काजारघाटीö रत्नागिरी, लांजाö साखरपाö देवरुख, लांजाö राजापूर, राजापूर मधून राजापूरöलांजाöरत्नागिरी, राजापूरöलांजा, मंडणगड आगरातून मंडणगडöरत्नागिरी, मंडणगडöदापोली, मंडणगडöखेड अशा एकूण 52 फेऱया सुटणार आहेत.
तिकीट दर वाढण्याची शक्यता
एसटी सेवेचे तिकीट दर सध्या स्थिर राहणार असले तरी आठवडाभरात तिकीट दरवाढ होण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टस्टींगची अंमलबजावणी करताना एका बसमध्ये 22 च प्रवाशी घेतले जाणार आहेत. त्यामुळे कमी भारमानामुळे एसटीला होणारी तुट भरू काढण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यासाठी तिकीट दरवाढ करावी लागण्याचे संकेत महामंडळाच्या अधिकाऱयांनी दिले.
रिक्षा वाहतुकीलाही अनुमती
जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या शिथीलता आदेशानुसार रिक्षा वाहतुकही आजपासून सुरू होणार आहे. वाहनचालक व 2 प्रवासी अशा मर्यादेत ही वाहतुक सुरू करता येणार आहे. केशकर्तनालय, सलून स्पा आदि दुकाने समाजिक अंतर ठेवणे व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.
सर्व दुकानेही उघडणार
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरू ठेवता येतील. प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल तसेच दुकानासमोर एकाच वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, असे बंधन राहणार आहे.
कुरीअर पोस्टसेवा सुरू
अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुरविण्यास मान्यता असेल. कुरियर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील. तसेच क्रीडा संकुल व मैदाने, सार्वजनिक मोकळ्या जागा याठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी असेल मात्र समूह आणि प्रेक्षक जमा होतील असे क्रीडाप्रकारांवर बंदी असेल.
अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून 50 च्या मर्यादेत व्यक्तीना उपस्थित राहता येईल.सर्व शासकीय कार्यालय 100 टक्के उपस्थितीत सुरळीत सुरु ठेवता येतील. या कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.
रूग्णसंख्या वाढण्याची भीती
एसटी सुरू करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दुर होणार असली तरी वर्दळ वाढल्याने कोरोनाच्या फैलावाची भीतीही व्यक्त होत आहे. जिल्हय़ातील ग्रामीण भागात चाकरमान्यांच्या आगमनामुळे रुग्ण संख्या वाढत असताना हक्काची एसटी सेवा सुरू होत आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढण्यची शक्यता नाकारता येत नाही.









