मेषः वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे अंधश्रद्धेकडे मन वळेल
वृषभः हटवादी स्वभावामुळे कलह निर्माण होतील
मिथुनः अधिकाराच्या जागेसाठी प्रयत्न करा, नक्की मिळेल
कर्कः प्रापंचिक सुखात कमतरता, बोलण्या चालण्यात कुठेही अडकू नका
सिंहः व्यवहारिक अंदाज चुकल्यामुळे भरमसाठ खर्च होतील
कन्याः कपटकारस्थान, गुप्त खलबते यापासून जपावे लागेल
तुळः बेफिकीर वृत्ती व दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडेल
वृश्चिकः वाचून अथवा पाहून औषधे घेण्याचा प्रयत्न करू नका
धनुः यश, कीर्ती, मानसन्मान, संततीसौख्य याबाबतीत उत्तम दिवस
मकरः धनलाभाचे प्रयत्न यशस्वी होतील. नव्या व्यवहारात फायदा
कुंभः तुमच्या कामाची पद्धत अनेक जण अनुसरण्याचा प्रयत्न करतील
मीनः कुठेतरी मिठाचा खडा पडल्याने संघर्षाला वाव





