मेष: मोठय़ा उलाढालीत यश मिळेल, आर्थिक प्रगती सुरु.
वृषभः काही बाबतीत निर्भीड राहिल्यास योग्य ठरेल.
मिथुन: वारसाहक्क, स्त्रीधन यादृष्टीने उत्तम ग्रहमान.
कर्क: विवाहाच्या वाटाघाटी करताना अंतर्गत बाबीकडे दुर्लक्ष नको.
सिंह: नवीन नोकरचाकर ठेवताना विशेष काळजी घ्यावी.
कन्या: परजातीय अथवा परधर्मीय व्यक्तीशी सोयरीक जुळेल.
तुळ: मौन आणि एकांतवास यामुळे प्रगती व आरोग्यात सुधारणा.
वृश्चिक: एखाद्या नातेवाईकासाठी काहीतरी खर्च करावा लागेल.
धनु: कोणत्याही बाबतीत अतिरेक नको, काटकसरीवर भर द्या.
मकर: बुद्धिमत्ता व मुत्सद्देगिरीची इतरांवर छाप पडेल.
कुंभ: ऐनवेळी काहीतरी अडचणी उद्भवतील, पर्यायी मार्ग ठेवा.
मीन: मित्रमंडळींच्या सहकार्याने दुर्लभ इच्छा पूर्ण होतील.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी









