कृष्णेच्या पात्रात उभे राहून निषेध
प्रतिनिधी / सांगली
ओबीसींच्या हक्काबाबत राज्य शासनाची नेहमीच बोटचेपी भूमिका राहिली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायत राज मधील आरक्षणावर गदा आली असल्याचा आरोप भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला. भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने येथील कृष्णा नदीच्या पात्रात उभा राहून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी आमदार गाडगीळ यांच्यासह भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक प्रकाश ढंग, सविता मदने, गजानन मगदूम, गणेश माळी यांच्यासह भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, राज्य सरकार असंवेदनशील आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणली. राज्यातील प्रत्येक घटक सरकारच्या नाकर्तेपणावर नाराज आहे. याची किमंत सरकारला चुकती करावी लागेल असे मत व्यक्त केले.
Previous Articleआकडे उघड करा नायतर कडकमधून सूट द्या
Next Article ग्लोबल टीचर डिसले आता जागतिक बँकेचे सल्लागार








