भाजपला पराभवाचा धक्का, आघाडीचा दोन्ही काँग्रेसला लाभ, बर्ल्ब : विधानपरीषद निवडणूक
प्रतिनिधी / मुंबई
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानपरिषदेच्या पाचपैकी चार जागा खिशात घालून आघाडीने भाजपला दणका दिला आहे. दोन्ही काँग्रेसला आघाडीचा पुरेपूर फायदा झालला. तर हाती राज्याचे नेतफत्व असतानाही शिवसेनेला अमरावतीची एकमेव जागा राखता आली नाही.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे ही निवडणूक आघाडीसाठी शलिटमस टेस्टश् होती तर विरोधी पक्ष म्हणून भाजपसाठी वर्चस्वाची लढाई होती. राज्यातील सुशिक्षित मतदारांचा अर्थात पदवीधर मतदारसंघातील कौल महत्वाचा असल्याने आघाडी आणि भाजपमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी चुरस होती.
पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जाळे, कार्यकर्त्यांची फौज,मतदार नोंदणीची आणि मतदारांना मतदान पेंद्रापर्यंत घेऊन येण्याची सक्षम यंत्रणा यामुळे भाजपने अनेक वर्षे दोन्ही मतदारसंघ ताब्यात ठेवले होते. आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपने दोन्ही ठिकाणी जोर लावला होता. पुणे, नागपूरची निवडणूक अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीची सूत्रे हातात घेतली होती.
आघाडीने स्थानिक नेत्यांसह आमदार आणि मंर्त्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. पुण्यात जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विश्वजित कदम, शंभूराज देसाई, दत्तात्रय भरणे, राजेंद्र पाटीलल्ल् यड्रावकर यांच्यसह माजी आमदार राजेश क्षीरसागर आदींनी आघाडीच्या उमेदवारांसाठी मेहनत घेतली. परिणामी राष्ट्रवादीला पहिल्यांदा पुणे पदवीधर मतदारसंघ सर करता आला. काँग्रेसलाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा जिंकता आली. नागपूरमध्येही आघाडीच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवले. आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय होता. भंडारा जिल्हा पालकमंत्री या नात्याने विश्वजित कदम यांनीही नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे आघाडीला यश मिळाले. औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी हॅटट्रिक साधली आहे.
आघाडीत शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा लढवली होती. येथे श्रीकांत देशपांडे हे शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र, देशपांडे यांना अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला. सरनाईक हे गफहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सरनाईक यांचा विजय हा राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा विजय मानला जात आहे. धुळे -नंदुरबार स्थानिक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी बाजी मारली. तथापि या विजयात भाजपपेक्षा पटेल यांचा वैयक्तिक वाटा मोठा आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल पाहता महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरात लोकहिताची जी कामे केली त्यावर लोकांनी मतांद्वारे शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येते. याचा अर्थ राज्यातील चित्र बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब आजच्या निकालात दिसले आहेश्
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेस
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. ही गंभीर बाब असून त्यांनी आत्मचिंतन करावेश्
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
थेट जनतेतून मतदान झालेल्या पाच विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत तब्बल 24 जिह्यात भाजपची धूळधाण झाली आहे. ही महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस आहेश्
अशोक चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते








