- राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण
ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

ते म्हणाले, राज्यात दररोज 3 लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी खासगी ठिकाणे वाढवली जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था केली जात आहे.
आता आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचे आहे. तसेच येत्या 3 महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा, आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- … तर लॉकडाऊन लावावे लागेल

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी माझे काल बोलणे झाले आहे. त्यांनी वाढती रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण असेच वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाऊन लावावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
तसेच उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. पण जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत.








