वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020-21 आय लीग फुटबॉल हंगामासाठी दिल्लीचे दोन संघ सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.
अलिकडे आगामी आय लीग स्पर्धेसाठी इच्छूक यजमान शहरांच्या शर्यतीमध्ये दिल्ली, रांची, जयपूर, जोधपूर, भोपाळ, लखनौ आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे. गेल्या आय लीग फुटबॉल हंगामात एकूण 11 क्लब संघांनी आपला सहभाग दर्शविला होता. मोहन बागान संघ एटीकेमध्ये विलीन झाला आहे. आता एटीके-बागान हा संघ आगामी फुटबॉल हंगामात एकत्रित खेळेल. दिल्लीचे दोन क्लब (संघ) आगामी फुटबॉल हंगामात सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा प्रत्यय हिरो पुरस्कृत आय लीग स्पर्धेत पाहावयास मिळेल, असा अंदाज पटेल यांनी व्यक्त केला. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या एका कार्यक्रमावेळी पटेल उपस्थित होते. हा कार्यक्रम दिल्ली फुटबॉलतर्फे आयोजित करण्यात आला होता.









