मोरजी/प्रतिनिधी
डॉक्टर,फार्मसी, दुध डेरी बँका,व सरकारी कार्यालयाना सुट
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाबाबत खबरदारी म्हणून आगरवाडा-चोपडे पंचायत क्षेत्रातील सर्व दुकाने सोमवार 15 जूनपासून रविवार 21 जून पर्यंत आठवडाभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला याकाळात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या पंचायतीच्या खास बैठकीत घेण्यात आला यापूर्वी शनिवार पासून चोपडे रस्त्यावरील मासळी मार्केट बंद करण्याचा निर्णय झाला होता आता डॉक्टर ,फार्मसी,दुध डेरी.सरकारी कार्यालये ,बँक वगळता अन्य आस्थापने बंद ठेवण्याचा ठेवण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवार ते रविवार असा एक आठवडाभर होणार आहे .पंचायतीचा हा निर्णय धाब्यावर बसवून या काळात बंदी घातलेल्या आस्थापना पैकी एखादे अस्थापन उघडे ठेवल्यास त्याला 5 हजाराचा दंड ठोठावण्याचा निर्णयही यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. या परिसरात कोरोनाबाधित सापडला नसला तरी केवळ सुरक्षा म्हणून हा लॉकडाऊन आहे, मात्र या परिसरातील वाहतूक सुरळीत राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
आगरवाडा तसेच चोपडे भागात मुंबई,पुणे यासारख्या रेड झोन मधून काही जण राहायला आल्याच्या पाश्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बैठकीला नागरिकही उपस्थित होते
सरपंच प्रमोद गावकर ,यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपसरपंच समिता अमोल राऊत ,पंच भगीरथ गावकर,पंच नितीन चोपडेकर ,पंच प्रमोदिनी आगरवाडेकर ,संगीता नाईक आदी सह माजी सरपंच अमोल राऊत ,बाबली राऊत ,आदी उपस्थित होते
या बैठकीत कोरोनाच्या सध्यस्थितीवर चर्चा झाली या चर्चेत उपस्थितानी चर्चा करून लोक हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेतले त्यात आगरवाडा चोपडे पंचायत क्षेत्रात परराज्यातून एखादी व्यक्ती व कुटुंब आल्यास त्याची माहिती पंचायतीला देणे ,पंचायत क्षेत्रात अध्याप भाडेपट्टीवर राहत असलेल्या बिगर गोमंतकीय मजूर ,विदेशी नागरिक यांची पंचायतीत नोंद करणे ,तसेच विलिगीकरण करण्यात आलेल्यांचा अहवाल सकारात्मक आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य चाचणीची त्यांना सक्ती करावी , याबरोबरच पंचायत क्षेत्रातील दुकाने आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आठवडा भरानंतर पुन्हा बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे तत्पूर्वी आजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमल बजावणी करताना आगरवाडा –चोपडे पंचायत क्षेत्रातील सर्व आस्थापनांना या विषयी खास नोटीस काढून पंचायत मंडळ फिरून माहिती देणार असल्याचे सरपंच श्री प्रमोद गावकर यांनी सांगितले









