गाकुवेध संघटनेतर्फे संशयिताविरोधात तक्रार : संशयिताला येत्य़ा तीन दिवसात अटक करा
प्रतिनिधी / फोंडा
समाजमाध्यमावर जातीवाचक आक्षेपार्ह टिपण्dणी करून आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संशयित सुदीप एम दळवी याला येत्या तीन दिवसात अटक करावी अन्यथा पुढे होणाऱया कायदा व सुव्यवस्थेला सर्वस्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार राहिल असा इशारा गाकुवेध संघटनेचे सरसचिव रूपेश वेळीप यांनी दिला आहे. याप्रकरणी तक्रारीच्या प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केलेली आहे.
संशयित सुदीप दळवी यांनी फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्dणीची दखल घेत आदिवासी समाजाच्या गोकुवेध संघटनेने काल सोमवारी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तसेच यापुर्वीही एसटी समाजबांधवावर जातीवाचक टिपण्dणी केल्याचा घटनेचा उल्लेख आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. सदर संशयितांच्या फेसबुकवरीवल पोफाईलमध्ये डोकावल्यास अनेक युवतीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळते. त्यानंतर माफीनामा सादर करून प्रकरण मिटवण्याचे प्रकार संशयिताने यापुर्वी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समाजमाध्यमावर जातीवाचक टिपण्dणी करणारा संशयिताला देशात असलेल्य़ा इतर जाती व संस्कृतीबद्दल आदर नसून तो आतंकवादी मनोवृत्तीचा असल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट होत असल्याचे गाकुवेध फोंडा विभागाचे अध्यक्ष सत्यवान गावकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
फेसबुकवरील मंत्री गोविंद गावडे यांच्या एका व्हीडीओवर सुदीप दळवी नामक अकाऊंटवरून 4 जून रोजी आक्षेपार्ह जातीवाचक टिपण्dणी करून एसटी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजमाध्यमावर एसटी जमातीसंबंधी आक्षेपार्ह मजकूर व आदिवसी नेते तथा मंत्री गोविंद गावडे यांच्यावर बदनामीकारक मजकूर लिहून भावना दुखावल्याप्रकरणी संशयित सुदीप एम. दळवी यांच्यावर कठोर कारवाई अशी मागणी गाकुवेधचे सरसचिव रूपेश वेळीप यांनी केली आहे.
दरम्यान उठा संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई करताना रविवार 6 रोजी रात्री फोंडा पोलिसांनी संशयिताविरूद्ध माहिती तंत्रज्ञानाच्या (66), भां.दं.सं. 295 कलमाखाली व अनुसुचित जाती आणि जमातीच्या अट्रोसिटी कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलिस संशयिताच्या माघावर असून याप्रकरणी उप अधिक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली फेंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.
फेसबुकवर ‘तो’ व्हीडीओ कोणी टाकला?
फेसबुकवर व्हीडीओ अपलोड करणारा बदलाच असून त्याचही शोध घेणे अंत्यत गरजेचे आहे. सदर व्यक्ती सरकारी सेवेत राहून माहिती हक्क कायद्याखाली अनेक घटनांचा पर्दाफाश करण्यात पटाईत आहे. त्याच्याविरोधात फोंडा पोलिस कोणती कारवाई करणार यावरही सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. सदर व्हीडीओ पोस्ट केल्यानंतर संशयित सुदीप यांनी त्या व्हिडीओवर टिपण्dणी केल्याचे आढळले आहे. संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञानच्या (66) कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आल्याने सायबर गुन्हया अंतर्गत गुन्हे शाखाकडे (क्राईम विभाग) वर्गीकृत करण्यात येणार की नाही यावरही समाजबांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रकरण क्राईम विभागाकडे वर्गीकृत करणार?
सदर घटनेत फोंडा पालीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केलेला असून पोलीस निरीक्षकही एसटी बांधवांपैकी असल्याने प्रकरण क्राईम विभागाकडे वर्गीकृत होणार याबाबत विचारणा केली असता, ती जबाबदारी पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार होणार असून सद्यपरिस्थिती पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तपास अधिकारी म्हणून जबाबदारी आपल्याकडे सोपविल्य़ाची माहिती पोलीस उपअधिक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी दिली. फरारी असलेला संशयित सुदीप दळवी अजून हाती लागलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.









