क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
लेकह्यू हॉस्पिटल बेळगाव यांच्या सौजन्याने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर मराठा मंडळ ताराराणीची आकांक्षा गणेबैलकरने मुलीच्या 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला.
बेळगावच्या रेसकोर्स मैदान येथे महिला व पुरुष गटासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात मराठा मंडळच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी आकांक्षा अर्जुन गणेबैलकर हिने 10 किमी मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. तिला रोख पाच हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कॉलेजचे प्रा. अरविंद पाटील, प्रशिक्षक व मार्गदर्शक लक्ष्मण कोलेकर, प्राचार्य एन. ए. पाटील व वडील अर्जुन गणेबैलकर यांचे तिला मार्गदर्शन लाभत असून मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन मिळत आहे.









