प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात केलेल्या एका गुन्ह्यासंदर्भात सध्या कोठडीत असलेल्या बल्जेरियन आरेपीला मडगावच्या न्यायालयाने अनेक अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश दिलो. या आरोपीची आई आजारी असल्याचे कारण या आरोपीने दिलेले आहे.
मिलेन देवरान्स्की हा मूळ बल्जेरियन नागरिक. या आरोपीने फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हृद्दीत केलेल्या एका गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आली होती. या आरोपीविरुद्ध आणखीनही काही आरोप आहेत.
मात्र मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका फळदेसाई यांच्या न्यायालयात चालू असलेल्या एका खटल्यात आरोपी मिलेन देवरान्स्की याने 74 वर्षीय आपली विधवा आई आजारी असल्याचे कागदपत्र सादर करुन तिच्या देखभालीसाठी आपल्याला मायदेशात जामिनावर पाठविण्यात यावे अशी न्यायालयाकडे विनंती केली.
सरकारपक्ष व आरोपीच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद झाला. धेन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या आरोपीला अनेक अटी घालून आरोपीला त्याच्या मायदेशात जाण्यास अनुमती दिली.









