सांगली / प्रतिनिधी
वसंत दादा सर्वोपचार रुग्णालयातील प्रसुती विभागात 41 तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बालिकेचा तिच्या आईनेच गळा घोटून खून केल्याची घटना समोर आली आहे .याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात या मुलीच्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून केलेल्या आईचे नाव सुमित्रा गंगाप्पा जुटी वय 30 राहणार वेळापूर, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव असे आहे. सुमित्रा ही चार दिवसापूर्वी वसंतदादा रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. 41 तासापूर्वी तिला मुलगी झाली.
ही मुलगी झाल्यानंतर ती नाराज होती या नाराजीतूंच रविवारी रात्री तिने हे कृत्य केले आहे.








