प्रतिनिधी / कोल्हापूर
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून खून करणाऱ्या नराधमास जिल्हा न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) असे या नराधमाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनील कुचकोरवी हा कावळा नाका येथील वसाहतीत राहतो. त्याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा तुकडे करून निघृण खून केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला.
या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने आज सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
Previous Articleजखमी हरिणाला ‘जीवदान’
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.