प्रतिनिधी / म्हापसा
मोले भगवान महावीर अभयारण्याचा भाग नैसर्गिकदृष्टय़ा गोव्याचे फुफुस्स आहे. त्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षण हे प्रदूषण विरहीत क्षेत्र असून त्यास चालना देणे महत्त्वाचे आहे. मेळावली सत्तरीतील लोकांना आयआयटी प्रकल्प नको आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र नेणे शक्य आहे असे मत आमदार जोशुआ डिसोझा यांनी व्यक्त केले.
म्हापसा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मेळावली येथे सरकार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या उच्च शैक्षणिक संस्थेचा प्रकल्प उभारू पाहत आहे. या प्रकल्पाला स्थानिकांकडून प्रखर विरोध होत आहे. मेळावलीवासी समाधानी नसल्यास प्रकल्प इतरत्र स्थलांतरित होऊ शकतो. गोव्यात अनेक सरकारी जागा आहेत. त्या जागी हा प्रकल्प सामावून घेणे शक्य आहे असे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.
गोव्यात सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अनेक आंदोलनाबाबत राजकीय टिप्पणी देण्यास जोशुआ यांनी नकार दिला. कोरोनाने लोकांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. अशावेळी निसर्गाशी निगडित प्रश्न हे गांभिर्याने घ्यायला हवेत. विकासाच्या नावे निसर्गाची हानी केली जाऊ नये. झाडांची बेसुमार कत्तल केल्यास श्वास घेण्यास शुद्ध हवाच राहाणार नाही असे ते म्हणाले. पॅसिनो हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा स्त्रोत्र आहे. मागील आठ महिने पॅसिनो बंद आहेत. पॅसिनोमुळे सरकारला महसूल मिळतो. शिवाय स्थानिकांना पॅसिनोमुळे अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. अनेकांचा उदरनिर्वाहाशी पॅसिनोचा संबंध जोडला आहे. पॅसिनो हटविल्यास सरकारचा महसूल व गोमंतकीयांना फायदा देणारा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असे म्हणत पॅसिनो खुले करण्याच्या निर्णयाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी समर्थन केले.
सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी डिसेंबरमध्ये वागातोर येथे सनबर्न ईडीएमची घोषणा केली आहे. विद्यमान स्थितीत हा निर्णय काही अंशी अयोग्य आहे. सरकारने यावर पुनरावलोकन करायला हवे. राज्यातील कोरोना स्थितीवर ईडीएमच्या परवानगीची सूत्रे अवलंबून आहेत. हा महोत्सव कमी लोकांना घेऊन ककरण्यात कोणताच फायदा नाही असे जोशुआ म्हणाले. नगरपालिका मंडळाचा कार्यकाळ संपत आला आहे. सरकारने पालिका निवडणुकीच्या बाबतीत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आमदार युवा अल्याने म्हापशातीस अनेक युवकांनी पालिका निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवडणूक जाहीर होताच निवडणुकीच्या बाबतीत आपम अराखडा तयार करणार आहोत. आताच त्याची आवश्यकता नाही असेही जोशुआ डिसोझा यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आयआयटी संदर्भात माझ्या सूचना मांडेन. आयआयटी प्रकल्प गोव्यात येत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु त्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे असे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.
पक्ष का सोडणार?
प्रत्येकाला कोणत्याही राजकीय पक्षात जाण्यास मोकळीक आहे. किरण कांदोळकर यांच्या जाण्याचे नेमके कारण आपल्याला माहीत नाही. त्याला अनेक कारणे असू शकतात. गोवा फॉरवर्ड पक्षात त्यांना भविष्य दिसत असल्याने ते कदाचित तिथे गेले असतील. भाजप सोडणे हा किरण कांदोळकरांचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हापसा मदरासंघ हा गेली वीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला आहे अशावेळी मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे जोशुआ म्हणाले.









