ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील आंबिल ओढ्यात करण्यात आलेल्या अतिक्रमणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. सोमवारी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. आज मंगळवारी काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबिल ओढ्यातील अतिक्रमण करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांची भेट घेतली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या भागाची पाहणी केली आहे. तसेच यावेळी राऊत यांनी स्थानिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तसेच पुणे महापालिकेला अशा प्रकारची कारवाई करताना लाज वाटली पाहिजे असा नितीन राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले, आंबिल ओढ्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली ही घटना दुर्दैवी आहे या घटनेचा निषेध करतो. कोरोनाचे संकट असताना कारवाई करायला प्रशासनाला लाज वाटली पाहिजे होती. कारवाई होत असताना महापौर झोपले होते का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे. तसेच अशीच कारवाई जर नागपुरमध्ये झाली असतील तर जेसीबीखाली झोपलो असतो असे वक्तव्य देखील नितीन राऊत यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.