तालुका दक्षता समितीची सभेत ठराव : फ्रि-सेल केरोसिन डेपो सुरू करण्याची मागणी
वार्ताहर /वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यातील केरोसिन पात्र लाभार्थींना आवश्यक केरोसिन उपलब्ध होण्?यासाठी किरकोळ केरोसिन दुकाननिहाय पात्र शिधापत्रिकांच्या याद्या घेण्?यात येऊन गॅसधारक शिधापत्रिका वगळण्?यात येऊन आवश्यक साठा निश्चित करण्?यात यावा. तो केरोसिन साठा प्राप्त होण्?यासाठी जिल्हास्?तरावर मागणी करण्?यात यावी. तसेच तालुक्यातील आंबा बागायतदार, मच्छीमार नौका व दहन प्रक्रियेसाठी आवश्यक तो केरोसिन साठा फ्रि-सेलमधून उपलब्ध होण्?यासाठी प्रयत्न करुन प्रसंगी तालुक्यातील कार्यरत किरकोळ केरोसिन धारकांपैकी किमान एका ठिकाणी फ्रि-सेल केरोसिन डेपो सुरु करण्?यात यावा, असा महत्वपूर्ण ठराव तालुका दक्षता समितीच्या सभेत करण्यात आला.
येथील तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकाऱयांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आलेली तालुका व नगरपरिषद दक्षता समितीची सभा विधानसभा विशेष हक्क समिती प्रमुख, आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री व नियोजन विभागाचे सिंधदुर्गचे आणि तालुका व नगरपरिषद दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांचे अध्?यक्षतेखाली वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे तालुका दक्षता समितीचे सभा झाली. यावेळी तालुका व न. प. दक्षता समितीचे सदस्य सचिव तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका पुरवठा अधिकारी प्रीतम वाडेकर, वेंगुर्ले नगराध्?यक्ष दिलीप गिरप, सभापती अनुश्री कांबळी, तालुका दक्षता समितीचे सदस्य सुचिता वजराटकर, मनाली हळदणकर, नम्रता बोवलेकर, योगश कुबल, दीपक बाळा जाधव, झिलू गोसावी, सुधाकर राणे, वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, न.प. दक्षता समितीचे सदस्या मंजुषा आरोलकर, श्वेता हुले, महेश उर्फ प्रकाश डिचोलकर, कासिम उर्फ का. हु. शेख, लवू तेरसे, पेद्रु रॉड्रिक्स, महादेव शिरसाट, वृषाली जाधव उपस्थित होते.
सदर सभेत पुरवठाविषयक माहिती व शासनाचे विविध योजनांबाबत पुरवठा विभागाकडून माहिती देण्?यात आली. त्यानंतर पुरवठासंबंधी विषयांवर चर्चा करण्?यात येऊन अध्?यक्षांनी त्यावर आवश्यक कार्यवाही करण्?याच्या सूचना दिलेल्या आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अंत्योदय इष्टांक तपासणीच्या सूचना
या सभेत राष्?ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत व अंत्योदय योजनेंतर्गत तालुक्याचा दोन्ही योजनांचा इष्?टांक तपासून आवश्यक त्या वाढीव इष्?टांकाची मागणी शासनाकडे करण्?याबाबतचे पत्र शासनाकडे सादर करण्?याच्या सूचना दिल्या. तसेच अंत्योदय योजनेकडील शिल्लक इष्?टांकानुसार पात्र लाभार्थी निवड करण्?यासाठी पात्र लाभार्थींच्या याद्या तयार करुन संबंधित गावचे ग्रामसभेत वाचन करण्?यासाठी त्या-त्या गावच्या ग्रामसभांचे आयोजन करण्?यासाठी सर्व ग्रामपंचायतीना पत्र देण्?याच्या सूचना दिल्या.
मयत, स्?थलांतरित सदस्?यांची नावे कमी करा!
तालक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकाननिहाय शिधापत्रिकामधील मयत व स्?थलांतरीत लाभार्थींची नावे तात्काळ कमी करण्?यात यावी. त्याकरीता धान्य दुकाननिहाय मयत, विवाह व अन्य कारणास्?तव स्?थलांतरित लाभार्थींची नावे दुकानदारांकडून प्राप्त करुन घ्यावीत. तसेच शिधापत्रिकाधारकांना तशा सूचना धान्य दुकानदार व तलाठी तथा ग्रामदक्षता समिती सचिव मार्फतदेण्?यात याव्यात, असे सांगितले.
तालुक्यातील केरोसिन साठा निश्चित करा!
वेंगुर्ले तालुक्यातील केरोसिन पात्र लाभार्थींना आवश्यक केरोसिन उपलब्ध होण्?याकरीता किरकोळ केरोसिन दुकाननिहाय पात्र शिधापत्रिकांच्या याद्या घेण्?यात येऊन गॅसधारक शिधापत्रिका वगळण्?यात येऊन आवश्यक साठा निश्चित करण्?यात यावा. तो केरोसिन साठा प्राप्त होण्?यासाठी जिल्हास्?तरावर मागणी करण्?यात यावी. तसेच तालुक्यातील आंबा बागायतदार, मच्छीमार नौका यांना व दहन प्रक्रियेसाठी आवश्यक तो केरोसिन साठा फ्रि-सेलमधून उपलब्ध होण्?यासाठी प्रयत्न करुन प्रसंगी तालुक्यातील कार्यरत किरकोळ केरोसिन धारकांपैकी किमान एका ठिकाणी फ्रि-सेल केरोसिन डेपो सुरु करण्?यात यावा, असा ठराव करण्?यात आला.
खानोली, वायंगणी धान्य दुकानांसाठी जाहिरनामा काढा!
तालुक्यातील खानोली व वायंगणी रास्तभाव धान्य दुकाने त्याच गावात सुरु होण्?यासाठी नव्याने जाहीरनामा काढून तालुक्यातील बचतगट यादी उपलब्ध करुन गावनिहाय बचतगटांना धान्य दुकान देण्?यासाठी आवश्यक ती बैठक आयोजित करण्?यात यावी, अशी सूचना करण्यात आली.
यासभेत अनेक महत्वाचे मुद्दय़ांवर आवश्यक त्या उपाययोजना व विशेष प्रयत्न करण्?याबाबत चर्चा करुन प्रशासनास सूचना करण्यात आल्या. सभेच्या सुरवातीस अध्?यक्ष दीपक केसरकर व उपस्थित सर्व समिती सदस्?यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्?पगुच्छ देऊन स्?वागत करण्?यात आले.









