गाडीमालक कोल्हापूरातील व्यावसायिक बेपत्ता
प्रतिनिधी / साखरपा, रत्नागिरी
साखरपा : रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणा जवळ एक बेवारस मोटारसायकल आढळून आली आहे. या गाडीचा मालक बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत चेतन गोपाळ चांगेला (५८/ कोल्हापूर) यांनी साखरपा पोलिसांत तक्रार दिली असून आसितभाई गोवर्धन सुतरिया (५९) असे बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
त्यांची दुचाकी क्रमांक MH 09 – DJ – 4863 ही आज पोलिसांना चक्रीवळणाजवळ अपघातग्रस्त अवस्थेत सापडली असून काहि अंतरावर त्यांचा मोबाईलही सापडला आहे.
साखरपा पोलिस दुरक्षेत्राचे एपीआय तुषार पाचपुते, एएसआय उकार्डे, हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव व सहकारी आणि देवरुख मधील राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते यांनी आज सकाळी घटनास्थळी शोध मोहीम राबवली. यावेळी गाडी आणि मोबाईल आढळून आला मात्र मालक बेपत्ता असल्याने हा नक्की घातपात की बनाव याबाबत शोध लावण्याचे आव्हान साखरपा पोलिसांसमोर आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









