प्रतिनिधी / शाहुवाडी
आंबा घाटात सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लीनर सचिन शामराव पाटील ( वय ४२,या.आळतूर, ता.शाहूवाडी) जागीच ठार झाला तर. चालकासह दोघांनी गाडीतून उड्या मारल्याने ते बचावले. अपघाताची साखरपा पोलीसात नोंद झाली असून चालक ज्ञानदेव मारूती कंक( वय ३२ )व सरदार भिमराव भोसले (वय २५रा.निळे.) हे जखमी झाले.
मिळालेल्या माहीती नुसार कोकणातून चिरा भरून ट्रक वारणानगर कडे निघाला होता. घाट चढत असतानाच वजरे खिंडीजवळील धोकादायक वळणावर बाजू देतानाच लोखंडी ग्रील तोडून ट्रक दरीत कोसळला. ट्रकने दोन पलटी मारल्या. यात सचिन पाटील हा केबीनमध्ये चिरडून ठार झाला रवीवारी . मध्य रात्रीच्या सुमारास साखरपा पोलीसांनी मृतदेह दरीतून बाहेर काढला. साखरपा येथे शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत सचिन हा घराचा अधार होता त्याच्या या अपघाती निधनाने पाटील कुंटूबीयाचां कर्ता पुरूष गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्यात एक मुलगा,दोन मुली पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई, वडील असा परीवार आहे.









