प्रतिनिधी/ देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात गतवर्षीच्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. एक वर्षाचा कालावधी उलटला तरी डागडुजीचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. घाटात मार्गावर अनेक ठिकानी खड्डे पडलेले आहेत. दरड खाली येण्याचा संभव असल्याने घाटातून प्रवास अजूनही धोकादायकच आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. अजूनही संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू आहे. घाटात दोन ठिकाणी दरडी खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे मोठय़ा पावसात रात्रीचा प्रवास करणे धोकादायक आहे.