प्रतिनिधी/ रत्नागिरी
आंबा घाटात रस्ता खचल्यामुळे बंद असलेली एसटीची वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्य़ा मात्र आता 10 दिवस उलटूनही हा रस्ता एसटीसाठी सुरू करण्यात आलेला नाह़ी यामुळे एसटीच्या 45 फेऱया बंदच असून त्याचा मोठा फटका एसटी विभागासह प्रवाशांनाही बसताना दिसत आह़े
रत्नागिरी जिह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका आंबा घाट मार्गाला बसला होत़ा ठिकठिकाणी दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी घटनांमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होत़ा यानंतर तात्पुरती रस्त्याची डागडुजी करून 10 टन वजनापर्यंत वाहतूक सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्य़ा मात्र एसटीच्या प्रवासी व मालवाहतुकीला हा मार्ग बंद ठेवण्यात आला होत़ा सध्या अणुस्कुरामार्गे रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आह़े
10 दिवस उलटूनही रस्ता दुरूस्तेचे काम रखडलेलेच
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होत़ी यावेळी रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाट मार्ग दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे व आंबा घाटमार्गे होणारी वाहतूक दोन दिवसात पूर्ववत करा, अशा सूचना पालकमंत्री अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या होत्य़ा मात्र आता तब्बल 10 दिवस उलटूनही हा मार्गावरील रस्ता दुरूस्तेचे काम रखडलेल्या अवस्थेत आह़े त्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत़
रत्नागिरी-कोल्हापूर हा अत्यंत महत्वाचा मार्ग मानला जात़ो रत्नागिरी जिह्यापासून जवळचे महानगर म्हणून कोल्हापूरला बघितले जात़े येथे व्यापारासाठी तसेच उपचारासाठी रूग्ण हे सातत्याने कोल्हापूर येथे जात असतात़ कोल्हापूर येथे आंबाबाई देवस्थान असल्याने देवीच्या दर्शनासाठी भक्त येथे जातात़ तसेच घाटावरून पर्यटक हे गणपतीपुळे व अन्य ठिकाणी जाण्यासाठी आंबा घाटमार्गे रत्नागिरी जिह्यात येतात़ यामुळे या मार्गावर एसटीची मोठी वर्दळ असत़े
आंबा घाटमार्गे एसटीच्या रत्नागिरी विभागातून दिवसाला एकूण 50 फेऱया धावत असतात़ घाट मार्ग बंद असल्याने सध्या अणुस्कुरामार्गे कोल्हापूर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आह़े केवळ दिवसाला 8 फेऱया सुरू ठेवण्यात आल्या आहेत़ याचा मोठा फटका एसटीच्या रत्नागिरी विभागाला बसत आह़े अणुस्कुरामार्गे होणाऱया वाहतुकीमुळे 54 किलोमीटरचे अंतर वाढत आह़े तसेच दीड तास अधिकचा वेळ लागत असल्याने वेळ व पैसा दोन्हींचे नुकसान एसटीला सोसावे लागत आह़े
वडापचा धंदा तेजीत
प्रशासनाने आंबा घाटमार्गे 10 टन पर्यंतची वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी दिली आह़े यामुळे वडापचा धंदा तेजीत सुरू झाला आह़े प्रवाशांना एसटीच्या पैशात वडाप वाहतूक करणारे कोल्हापूरपर्यंत पोहोचवित आहेत़ अणुस्कुरामार्गे दीड तास अधिकचा वेळ वाचवण्यासाठी प्रवासी वडापचा आधार घेत कोल्हापूरकडे जात आहेत. एसटी प्रशासनाकडून 10 टनापर्यंतची वाहतूक ही एसटी मर्यादित प्रवासी घेवून करण्यास तयार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले होत़े मात्र प्रशासनाकडून एसटीला वाहतूक करण्यास परवानगी देण्यास नकार देण्यात आल़ा









