फळाला काळे डाग पडण्याची चिंता
प्रतिनिधी / कणकवली:
गेले काही दिवस जिल्हय़ात सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. जानेवारी महिन्यात अचानक पाऊस झाल्याने आंबा व काजू पिकावर परिणाम होणार आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पावसामुळे काजू-आंबा बागायतदार शेतकरी पुरता अडचणीत येणार आहे. यासंदर्भात कृषी शास्त्रज्ञांनी काजू-आंबा बागायतदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
काही दिवसापूर्वी जिल्हय़ात गारठा वाढला होता. त्यामुळे जिल्हय़ातील काजू -आंबा बागायतदार सुखावला होता. मात्र, आठवडाभरात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. सध्या आंबा व काजूचा मोहराचा आणि फळधारणेचा हंगाम मोठय़ा प्रमाणात आहे. शेतकऱयांनी आधीच पालवी फुलण्यासाठी आणि झाडावर मोहर टिकण्यासाठी कीटकनाशक औषधांची फवारणी केली असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडल्यामुळे दोन्ही पिकांना धोका पोचण्याची शक्मयता आहे.
पावसामुळे मोहोर कुजण्याबरोबर भुरी तसचे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. त्यामुळे फळांना वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागणार आहेत. पावसामुळे फळधारणेचा फुलोरा धुवून निघत आहे. फुलोऱयामध्ये पाणी साचत असल्याने फळे कुजण्याबरोबर ते गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच फळाला काळे डाग पडण्याची भीती आहे.
कोकण कृषी विद्यापिठातर्फे वातावरणात वारंवार होणाऱया बदलांच्या अनुषंगांने हापूस व काजू बागायतीबाबत विविध उपाययोजना सुचविल्या जातात. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी कोकण प़ृषी विद्यापिठाने कार्बेन्डॉझिम किंवा थायोफिनेट मिथील यापैकी कोणतेही एक औषध एक लीटर पाण्यात एक ग्रॅम घालून फवारणी करण्याचा उपाय सुचविला आहे. बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापिठाच्या सल्ल्याकडे लक्ष ठेवून त्याचा अवलंब करावा. अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून बागायतीमधील संपूर्ण उत्पन्न बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकणार नाही. यासाठी बागायतदारांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे कृषी अभ्यासकांनी म्हटले आहे.