ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाने थैमान घातले असतानाच आंध्रप्रदेशात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन 15 पट अधिक संक्रमणकारक आहे. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (CCMB) च्या वैज्ञानिकांनी हा स्ट्रेन शोधून काढला आहे.
एपी असे या स्ट्रेनचे नाव असून, वैज्ञानिक भाषेत त्याला N440K स्ट्रेन म्हटले जाते. हा स्ट्रेन आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात आढळून आला आहे. जो B1.617 आणि B1.618 व्हेरियंटहून अधिक ताकदवान आणि धोकादायक आहे. या स्ट्रेनची लागण झाल्यास लोक दोन ते तीन दिवसात आजारी पडतात.
इतर स्ट्रेनपेक्षा हा स्ट्रेन 15 पट अधिक संक्रमणकारक असल्यानेच देशात दुसरी लाट शिखरावर पोहचली आहे. आंध्र आणि तेलंगणासह देशाच्या अनेक भागात आता हा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान आंध्र आणि तेलंगणामध्ये नोंदवलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे याच स्ट्रेनमुळे झाली असल्याचा संशोधकांचा दावा आहे.









