सोनिपत :
शेतकरी आंदोलनादरम्यान शनिवारी सिंघू सीमेवर 40 वषीय शेतकऱयाने आत्महत्या केली. पंजाबमधील रहिवासी असलेल्या अमरिंदर सिंग यांनी विष सेवन केल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाला. त्याला सोनिपत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथेच त्याचा मृत्यू झाला.
कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. यावेळी, आत्तापर्यंत जवळपास 50 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी काही शेतकरी थंडीमुळे दगावले आहेत, तर काहींनी आत्महत्या केली. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शेतकऱयांच्या मृत्यूसंदर्भात मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. शेतकऱयांच्या वाढत्या मृत्यूच्या घटनांवर प्रियंका गांधींनी चिंता व्यक्त केली. शेतकऱयांची मागणी मान्य न केल्याबद्दल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला असंवेदनशील असे संबोधले आहे.









