क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
स्पार्कलिंग स्टार्स असोसिएशनने आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराज्य 13 वर्षाखालील आंतर क्रिकेट अकादमी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साग गोवा आणि सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमीने विजय नोंदविले. कालपासून या स्पर्धेला कुडचडे येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर सुरूवात झाली. या स्पर्धेत साग गोवा, सावंतवाडीची एम्स क्रिकेट अकादमी, बेळगावची आनंद क्रिकेट अकादमी आणि धारवाडची धारवाड क्रिकेट अकादमी हे चार संघ भाग घेत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन कुडचडेचे माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रशिक्षक संदीप नाईक, आनंद क्रिकेट अकादमीचे आनंद कराडी आणि साग गोवा संघाचे प्रशिक्षक अजय चौहान उपस्थित होते. काल खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साग गोवाने बेळगावच्या आनंद क्रिकेट अकादमीचा 11 धावानी पराभव केला तर दुसऱया सामन्यात सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमीने धारवाड क्रिकेट अकादमीला 21 धावानी नमविले.
संक्षिप्त धावफलकः साग गोवा, 25 षटकात 5 बाद 144 (आदित्य कोटा 34, साई नाईक 10, गौरेश साजिलाल 15, यश कसवणकर नाबाद 47 धावा. नीलेश रणसोबे 2-32, नील पवार 1-24, साहिल कंडळ 1-10, अथर्व कर्डी 1-6) विजयी विरूद्ध आनंद क्रिकेट अकादमी, 25 षटकात 7 बाद 133 (नीलेश रणसोबे व ऋषिकेश नाईक प्रत्येकी 26, ओम जकाती 13 धावा. यश कसवणकर 2-11, कानन गुप्ता, शिवेंद्र नाईक, सिद्धांत कुलकर्णी व नभाया बांदेकर प्रत्येकी एक बळी).
एम्स क्रिकेट अकादमी- सावंतवाडी, 25 षटकात 6 बाद 163 (नीरज जाधव 33, मंथन नाईक 32, राहुल नेवगी 10, सुजय कोरगावकर 17 धावा. आर. पी. अंश 1-27, आर. एच. अनर 1-19) विजयी विरूद्ध धारवाड क्रिकेट अकादमी, 25 षटकात 7 बाद 142 (आर. पी. आको 30, ई. डी. महादेव 21, आर. एच. अनय 28 धावा. रुद्रेश कन्विक 2-28, पराग अराबायकर 2-15, उस्मा खान व आर्यन दुधवाडकर प्रत्येकी एक बळी).









