विशेषविमानसेवाराहणारसुरू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई सेवा 15 जुलैपर्यंत बंदच राहील, असा आदेश शुक्रवारी केंद्र सरकारने जारी केला. मात्र हवाई मार्गाने मालवाहतुकीसह विशेष विमान सेवा सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट केले.
जगभरात कोरोना प्रादुर्भावामुळे 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली. 1 जूनपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली. तेव्हापासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच मालवाहतूक व विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीही आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू झाली होती. आता 15 जुलैपर्यंत व्यावसायिक आतंरराष्ट्रीय हवाई सेवा बंदच राहील. कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहून आणि संबंधित राष्ट्रांनी परवानगी दिल्यानंतरच हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी दिली.









