प्रतिनिधी / सांगली
आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद साबळे यांच्या मागणीला यश आले. 2 जानेवारी रोजी संजयनगर पत्र कातारी समोरील भूखंडाला चारी बाजू भिंत बांधून व पासपोर्ट जाळी बांधणे या मागणीला मंजुरी मिळाली व कामाला सुरुवात झाली.
यावेळी संजय नगर भागातील महिलावर्ग पुरुष वर्ग मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी भूमिपूजन व श्रीफळ वाढवून ज्येष्ठ नागरिक विष्णू साबळे यांच्या हस्ते कामाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे प्रभारी मिलिंद साबळे, सामाजिक कार्यकर्ते सुशांत काटे, आरपीआयचे सुनील साबळे, तसेच कुंडलिक पुणे व व विकास हक्के आणि आधी पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. त्यावेळी कामाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे धडाडीचे नगर शहर अभियंता परमेश्वर हळकुंडे यांनीही हजेरी लावली होती.








