ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नजीब ताराकाई (वय 29) याचे आज निधन झाले. मागील आठवड्यात नजीबचा अपघात झाला होता. तेव्हापासून तो कोमात होता. आज उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून नजीबला श्रद्धांजली वाहिली आहे.
नंगरहार येथे रस्ता ओलांडताना एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. यामध्ये नजीबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तारकाई कोमात गेला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती यापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती.
2014 मध्ये नजीबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 12 टी 20 आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. टी 20 मध्ये त्याने चार अर्धशतकांसह 258 धावा केल्या आहेत. तर 24 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.









